येरे येरे पाणी पाणी पिक दे रे सोन्यावानी अमृताची ओंजळण भर धरणीच्या खाणी फुलू दे रे धरणीला जीवजीवांचा संसार येथे मुक्याचा जिव्हाळा रान मायेचा आधार निसर्गाच्या अंगणात नांदती रे सारे सुख तुझ्या अश्रृच्या थेंबान सजती रे हिर्वे मुख बिज अंकुर रोपटे हात लावीती नभाला तुझ्या थेंबांची करणी पाणी येते नारळाला तुझ्या आशेचा रे सूर येऊ दे रे कानोकानी अमृताची ओंजळण भर धरणीच्या खाणी धनंजय गव्हाले (लेखापाल) महावीर बँक शाखा सिल्लोड.
वेळ आणि कर्माची सांगड घालुनी तू यशाची तू कास धर सुख भोगशील जीवनभर नियतीचा हा खेळ माणसा ओळखून तू चाल माणसा