जिवनात नाती तशी बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात नातं मनापासून जपणारी मात्र फार कमी असतात काही नाती असतात रक्ताची काही नाती असतात हृदयाची काही नाती असतात जन्मोजन्मीची काही नाती असतात क्षणाची खरं नातं तेच असतं जे जगायला शिकवत संकटाशी सामना करायला तयार करतं स्वप्न पूर्ण करण्यास प्रवृत्त करतं बंधने न लादता जगण्याचे स्वातंत्र देतं जिवनात नाती बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात विश्वासाचा हात पाठीवर ठेवतं आसवांना आपल्या कवेत घेतं सुख - दुःखात सहभागी होतं आपलेपणाची जाणीव करून देतं ज्यावर अभिमान वाटावा असं वागतं जिवनात नाती बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात. कु. आश्विनी कुंभार भिवंडी जि. ठाणे
शिक्षकांतील कवी
वेळ आणि कर्माची सांगड घालुनी तू यशाची तू कास धर सुख भोगशील जीवनभर नियतीचा हा खेळ माणसा ओळखून तू चाल माणसा