Skip to main content

Posts

नाती

  जिवनात नाती तशी बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात नातं मनापासून जपणारी मात्र फार कमी असतात   काही नाती असतात रक्ताची काही नाती असतात हृदयाची काही नाती असतात जन्मोजन्मीची काही नाती असतात क्षणाची   खरं नातं तेच असतं जे जगायला शिकवत संकटाशी सामना करायला तयार करतं स्वप्न पूर्ण करण्यास प्रवृत्त करतं बंधने न लादता जगण्याचे स्वातंत्र देतं जिवनात नाती बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात   विश्वासाचा हात पाठीवर ठेवतं आसवांना आपल्या कवेत घेतं सुख - दुःखात सहभागी होतं आपलेपणाची जाणीव करून देतं ज्यावर अभिमान वाटावा असं वागतं जिवनात नाती बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात. कु. आश्विनी कुंभार भिवंडी जि. ठाणे
Recent posts

आई

  जीवनभर सर्वांसाठी खपते           तळहाताच्या फोडासम जपते           जीव मुठीत धरून संसार करते           अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||                     जागुनी स्वतः रात्रंदिवस खास                     लेकरू बरे होईल धरी ध्यास                     मोडीले दागदागिने  औषधास                     अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||           माझ्या शिक्षणाचा विचार ध्यानी           शिकुनी मोठी हो सांगे कानोकानी           माझे सुख हेच तिचे स्वप्न मनी           अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||                     प्रेमरूपी सागराची वाहती धार                     दिली संस्कारांची शिदोरी अपार                     जाता सासरी मज आठवे वारंवार                     अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||           संकटावर लढली झाली तलवार           फाटका संसार आवरे लेकरे चार           कसे सांगू तुझे अनंत उपकार           अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||                     सुखासाठी करी पदराची झोळी                    आनंदात आमुच्या सुखद टाळी                    विणते ममतेने प्रेमाची घट्ट जाळी                    अशी कष्टाची मूर्ती आ

महाराष्ट्र माझा

  ऐतिहासिक , सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे फार मोठा महाराष्ट्र देशाच्या संस्कृतीचा ठसा   संत महंत , ऋषी मुनिंची पाऊले पडली इथेच संतांची शूरवीरांचा त्याग , पराक्रम आणि आहे परंपरा देशप्रेमाची   सर्वधर्मसमभावाचे इथेच केले आहे पालन शिवरायांनी केले हिंदवी स्वराज्य आणि रयतेचे राज्य स्थापन   लढा उभारून इंग्रजांविरुद्ध प्राण देउनी बनले महान देशभक्त कष्ट यातना अनंत भोगल्या सांडले त्यांचे देशासाठी रक्त   पावन स्पर्शाने उपकृत झाली संतांची मांदियाळी इथेच रुजली समाजसुधारकांच्या प्रबोधनाने महाराष्ट्र मराठी मने जपली   गीत , पोवाडे , कविता रचूनी महाराष्ट्राच्या मातीचे वर्णन मराठी मातीचा ललाटी टिळा थोरवी गायली करुनि कीर्तन   किती गाऊ मराठीचा गोडवा वैभवशाली इतिहासाचा परडा प्रगतीचे उंच शिखर गाठले चढूनि विविध क्षेत्राच्या कडा किरण पेठे , नागपूर

गौरवशाली महाराष्ट्र

  समाजसुधारक , विचारवंत , संतांची पावनभूमी अमृताचा गोडवा मराठी मायबोलीत महाराष्ट्राचा काय वर्णावा गौरवशाली इतिहास माती जाते कस्तुरीच्या सुगंधाला झेलीत   नद्या , सरोवरे , नैसर्गिक सौंदर्याने नटला गड-किल्ल्यांनी महाराष्ट्र सजला नजर ना लागो कुणाची या वैभवाला शूरवीर , देशभक्त , राष्ट्रप्रेमी यांचा वारसा हा रुजला   आज कोरोनाच्या काळ्या सावटाशी लढतो आहे माझा महाराष्ट्र कित्येक कुटुंब केली त्याने उध्वस्त अर्ध्यावर मोडले संसार झाले सर्व नष्ट   जात-पात-धर्म विसरून माणूस माणसासाठी चहू दिशेला धावत आहे होऊनी आर्त संतांची सर्वधर्मसमभावाची शिकवण आज होताना दिसत आहे खरी सार्थ   डॉक्टर्स , परिचारिकांच्या पांढर्‍या वेशातील देवदूत लढत आहे अहोरात्र तैनातीला चोवीस तास खाकी वर्दीतील संरक्षक संपेल कधी हे कोरोनाचे विध्वंसक सत्र   लवकरच महाराष्ट्र मुक्त श्वास घेईल कारोनाचे विषारी वारे परतूनी लाविल वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार हा महाराष्ट्र माझा पुन्हा गरुडझेप घेईल श्रीम. तोरणे रेश्मा अनिल    ता.श्रीरामपूर, जि. अहमदनगर

पिंजरा

  आकाशी झेप घे रे पाखरा तोडुनि अज्ञान पिंजरा यशवंत हो , गुणवंत हो हीच मनी कामना || धृ ||   खडतर वाट यश शिखराची घेऊनी शिदोरी ज्ञानाची पसरवून पंख यत्न जिद्दीचे घे उंच भरारी घे रे पाखरा तोडुनी अज्ञान पिंजरा || १ ||   भेटेल तुला वादळ वारा यशापयशाच्या अनेक लाटा झुंज देउनी तयांना घे उंच भरारी घे रे पाखरा तोडुनी अज्ञान पिंजरा || २ ||   या विश्वाचे निळ्या नभी नाही तुला भिंत आडवी उभी पसरवून श्रमाचे बळकट पंख घे उंच भरारी घे रे पाखरा तोडुनी अज्ञान पिंजरा || ३ || श्री कैलास भाऊलाल बडगुजर (कवी विभास) बी.एस्सी. , बी. एड. स्वामी विवेकानंद नगर , वासिंद (पूर्व) , जिल्हा ठाणे पिन 421 604

बिनभिंतींची शाळा...

  सकाळ होता किलबिल करती जमून पाखरे होती गोळा पिंपळ पारावरती भरते बिनभिंतींची त्यांची शाळा...   डहाळीवरती बैठक बसते दुपार होता कलती वेळ टुणटुण टुणटुण उड्या मारूनी सुरू होतो त्यांचा खेळ...   पोपट लागतो कविता वाचू मोर लागतो थुईथुई नाचू राघू घालतो मैनेला शीळ मोराच्या डोकी सोन्याचा तीळ   नाही पाटी ; नाही पुस्तक बिनफळ्याची ही तर शाळा इंद्रधनुच्या आकाराच्या बगळे गुंफती सुंदर माळा...   बिनछताची यांची शाळा वास्तुविशारद आहे लहान सुगरण बांधतो सुंदर महाल नाही ठेवत ऐवज गहाण...   कोकीळ कुहू ; चिमणी चिवचिव सुंदर जमली गट्टी-दोस्ती नाही करीत कुणी आता गडबड-गोंधळ ; दंगा-मस्ती...   भूक लागली ; दमली पाखरे पेरूच्या बागेत उडाला थवा बागेमध्ये बुजगावणं दिसे भ्याली पाखरे गुरुजी भासे...   पाखरे काढती तेथून पळ ज्वारीच्या शेतात ठोकती तळ ताटव्यासंगे डोलत पक्षी हळूच एक-एक दाणा भक्षी...   चोचीत घेतले दाणे भरून पिल्ले बसली घरटे धरून पिल्ले-पाखरे झाली गोळा सूर्य बुडाला सुटली शाळा...!   नानासाहेब बोरस्ते नाशिक 

परिपक्वता

  नेसली साडीचोळी केले विवाहाला सज्ज कसा असन घरगडी नाही काहीच समज   पालकांची जिम्मेदारी अल्पवयात लग्न केले नाही तनमनाची   परिपक्वता सारे विस्कटून गेले   कमी वयातच प्रसूति तीन वर्षात तीन झाले झाली आभाळ जिवाची दरवर्षी पाळणा हाले   खेळण्याचे ते वय घराची जिम्मेदारी आली दरवर्षी बाळंतपण रक्ताची कमी झाली   समाजातील चालीरीती काही थांबता थांबेना किती सोसावे तिने जिवंतपणीच मरणयातना   थांबारे पालकांनो लेकीत परिपक्वता नाही भावी संसाराची स्वप्न तुमच्या विना नाही   थांबला बालविवाह पालकही परिपक्व झाले पण अजुनही काही जागी बालविवाह चाले डॉक्टर संजय भानुदास पाचभाई नागपूर