Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

नाती

  जिवनात नाती तशी बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात नातं मनापासून जपणारी मात्र फार कमी असतात   काही नाती असतात रक्ताची काही नाती असतात हृदयाची काही नाती असतात जन्मोजन्मीची काही नाती असतात क्षणाची   खरं नातं तेच असतं जे जगायला शिकवत संकटाशी सामना करायला तयार करतं स्वप्न पूर्ण करण्यास प्रवृत्त करतं बंधने न लादता जगण्याचे स्वातंत्र देतं जिवनात नाती बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात   विश्वासाचा हात पाठीवर ठेवतं आसवांना आपल्या कवेत घेतं सुख - दुःखात सहभागी होतं आपलेपणाची जाणीव करून देतं ज्यावर अभिमान वाटावा असं वागतं जिवनात नाती बरीच असतात काही दूरची तर काही जवळची असतात. कु. आश्विनी कुंभार भिवंडी जि. ठाणे

आई

  जीवनभर सर्वांसाठी खपते           तळहाताच्या फोडासम जपते           जीव मुठीत धरून संसार करते           अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||                     जागुनी स्वतः रात्रंदिवस खास                     लेकरू बरे होईल धरी ध्यास                     मोडीले दागदागिने  औषधास                     अशी कष्टाची मूर्ती आई माझी ||           माझ्या शिक्षणाचा विचार ध्यानी           शिकुनी मोठी हो सांगे कानोकानी ...

महाराष्ट्र माझा

  ऐतिहासिक , सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे फार मोठा महाराष्ट्र देशाच्या संस्कृतीचा ठसा   संत महंत , ऋषी मुनिंची पाऊले पडली इथेच संतांची शूरवीरांचा त्याग , पराक्रम आणि आहे परंपरा देशप्रेमाची   सर्वधर्मसमभावाचे इथेच केले आहे पालन शिवरायांनी केले हिंदवी स्वराज्य आणि रयतेचे राज्य स्थापन   लढा उभारून इंग्रजांविरुद्ध प्राण देउनी बनले महान देशभक्त कष्ट यातना अनंत भोगल्या सांडले त्यांचे देशासाठी रक्त   पावन स्पर्शाने उपकृत झाली संतांची मांदियाळी इथेच रुजली समाजसुधारकांच्या प्रबोधनाने महाराष्ट्र मराठी मने जपली   गीत , पोवाडे , कविता रचूनी महाराष्ट्राच्या मातीचे वर्णन मराठी मातीचा ललाटी टिळा थोरवी गायली करुनि कीर्तन   किती गाऊ मराठीचा गोडवा वैभवशाली इतिहासाचा परडा प्रगतीचे उंच शिखर गाठले चढूनि विविध क्षेत्राच्या कडा किरण पेठे , नागपूर