Skip to main content

Posts

गौरवशाली महाराष्ट्र

  समाजसुधारक , विचारवंत , संतांची पावनभूमी अमृताचा गोडवा मराठी मायबोलीत महाराष्ट्राचा काय वर्णावा गौरवशाली इतिहास माती जाते कस्तुरीच्या सुगंधाला झेलीत   नद्या , सरोवरे , नैसर्गिक सौंदर्याने नटला गड-किल्ल्यांनी महाराष्ट्र सजला नजर ना लागो कुणाची या वैभवाला शूरवीर , देशभक्त , राष्ट्रप्रेमी यांचा वारसा हा रुजला   आज कोरोनाच्या काळ्या सावटाशी लढतो आहे माझा महाराष्ट्र कित्येक कुटुंब केली त्याने उध्वस्त अर्ध्यावर मोडले संसार झाले सर्व नष्ट   जात-पात-धर्म विसरून माणूस माणसासाठी चहू दिशेला धावत आहे होऊनी आर्त संतांची सर्वधर्मसमभावाची शिकवण आज होताना दिसत आहे खरी सार्थ   डॉक्टर्स , परिचारिकांच्या पांढर्‍या वेशातील देवदूत लढत आहे अहोरात्र तैनातीला चोवीस तास खाकी वर्दीतील संरक्षक संपेल कधी हे कोरोनाचे विध्वंसक सत्र   लवकरच महाराष्ट्र मुक्त श्वास घेईल कारोनाचे विषारी वारे परतूनी लाविल वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार हा महाराष्ट्र माझा पुन्हा गरुडझेप घेईल श्रीम. तोरणे रेश्मा अनिल    ता.श्रीरामपूर, ज...

पिंजरा

  आकाशी झेप घे रे पाखरा तोडुनि अज्ञान पिंजरा यशवंत हो , गुणवंत हो हीच मनी कामना || धृ ||   खडतर वाट यश शिखराची घेऊनी शिदोरी ज्ञानाची पसरवून पंख यत्न जिद्दीचे घे उंच भरारी घे रे पाखरा तोडुनी अज्ञान पिंजरा || १ ||   भेटेल तुला वादळ वारा यशापयशाच्या अनेक लाटा झुंज देउनी तयांना घे उंच भरारी घे रे पाखरा तोडुनी अज्ञान पिंजरा || २ ||   या विश्वाचे निळ्या नभी नाही तुला भिंत आडवी उभी पसरवून श्रमाचे बळकट पंख घे उंच भरारी घे रे पाखरा तोडुनी अज्ञान पिंजरा || ३ || श्री कैलास भाऊलाल बडगुजर (कवी विभास) बी.एस्सी. , बी. एड. स्वामी विवेकानंद नगर , वासिंद (पूर्व) , जिल्हा ठाणे पिन 421 604

बिनभिंतींची शाळा...

  सकाळ होता किलबिल करती जमून पाखरे होती गोळा पिंपळ पारावरती भरते बिनभिंतींची त्यांची शाळा...   डहाळीवरती बैठक बसते दुपार होता कलती वेळ टुणटुण टुणटुण उड्या मारूनी सुरू होतो त्यांचा खेळ...   पोपट लागतो कविता वाचू मोर लागतो थुईथुई नाचू राघू घालतो मैनेला शीळ मोराच्या डोकी सोन्याचा तीळ   नाही पाटी ; नाही पुस्तक बिनफळ्याची ही तर शाळा इंद्रधनुच्या आकाराच्या बगळे गुंफती सुंदर माळा...   बिनछताची यांची शाळा वास्तुविशारद आहे लहान सुगरण बांधतो सुंदर महाल नाही ठेवत ऐवज गहाण...   कोकीळ कुहू ; चिमणी चिवचिव सुंदर जमली गट्टी-दोस्ती नाही करीत कुणी आता गडबड-गोंधळ ; दंगा-मस्ती...   भूक लागली ; दमली पाखरे पेरूच्या बागेत उडाला थवा बागेमध्ये बुजगावणं दिसे भ्याली पाखरे गुरुजी भासे...   पाखरे काढती तेथून पळ ज्वारीच्या शेतात ठोकती तळ ताटव्यासंगे डोलत पक्षी हळूच एक-एक दाणा भक्षी...   चोचीत घेतले दाणे भरून पिल्ले बसली घरटे धरून पिल्ले-पाखरे झाली गोळा सूर्य बुडाला सुटली शाळा...!   नानासाहेब बोरस्ते ...

परिपक्वता

  नेसली साडीचोळी केले विवाहाला सज्ज कसा असन घरगडी नाही काहीच समज   पालकांची जिम्मेदारी अल्पवयात लग्न केले नाही तनमनाची   परिपक्वता सारे विस्कटून गेले   कमी वयातच प्रसूति तीन वर्षात तीन झाले झाली आभाळ जिवाची दरवर्षी पाळणा हाले   खेळण्याचे ते वय घराची जिम्मेदारी आली दरवर्षी बाळंतपण रक्ताची कमी झाली   समाजातील चालीरीती काही थांबता थांबेना किती सोसावे तिने जिवंतपणीच मरणयातना   थांबारे पालकांनो लेकीत परिपक्वता नाही भावी संसाराची स्वप्न तुमच्या विना नाही   थांबला बालविवाह पालकही परिपक्व झाले पण अजुनही काही जागी बालविवाह चाले डॉक्टर संजय भानुदास पाचभाई नागपूर