Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

बिनभिंतींची शाळा...

  सकाळ होता किलबिल करती जमून पाखरे होती गोळा पिंपळ पारावरती भरते बिनभिंतींची त्यांची शाळा...   डहाळीवरती बैठक बसते दुपार होता कलती वेळ टुणटुण टुणटुण उड्या मारूनी सुरू होतो त्यांचा खेळ...   पोपट लागतो कविता वाचू मोर लागतो थुईथुई नाचू राघू घालतो मैनेला शीळ मोराच्या डोकी सोन्याचा तीळ   नाही पाटी ; नाही पुस्तक बिनफळ्याची ही तर शाळा इंद्रधनुच्या आकाराच्या बगळे गुंफती सुंदर माळा...   बिनछताची यांची शाळा वास्तुविशारद आहे लहान सुगरण बांधतो सुंदर महाल नाही ठेवत ऐवज गहाण...   कोकीळ कुहू ; चिमणी चिवचिव सुंदर जमली गट्टी-दोस्ती नाही करीत कुणी आता गडबड-गोंधळ ; दंगा-मस्ती...   भूक लागली ; दमली पाखरे पेरूच्या बागेत उडाला थवा बागेमध्ये बुजगावणं दिसे भ्याली पाखरे गुरुजी भासे...   पाखरे काढती तेथून पळ ज्वारीच्या शेतात ठोकती तळ ताटव्यासंगे डोलत पक्षी हळूच एक-एक दाणा भक्षी...   चोचीत घेतले दाणे भरून पिल्ले बसली घरटे धरून पिल्ले-पाखरे झाली गोळा सूर्य बुडाला सुटली शाळा...!   नानासाहेब बोरस्ते ...

परिपक्वता

  नेसली साडीचोळी केले विवाहाला सज्ज कसा असन घरगडी नाही काहीच समज   पालकांची जिम्मेदारी अल्पवयात लग्न केले नाही तनमनाची   परिपक्वता सारे विस्कटून गेले   कमी वयातच प्रसूति तीन वर्षात तीन झाले झाली आभाळ जिवाची दरवर्षी पाळणा हाले   खेळण्याचे ते वय घराची जिम्मेदारी आली दरवर्षी बाळंतपण रक्ताची कमी झाली   समाजातील चालीरीती काही थांबता थांबेना किती सोसावे तिने जिवंतपणीच मरणयातना   थांबारे पालकांनो लेकीत परिपक्वता नाही भावी संसाराची स्वप्न तुमच्या विना नाही   थांबला बालविवाह पालकही परिपक्व झाले पण अजुनही काही जागी बालविवाह चाले डॉक्टर संजय भानुदास पाचभाई नागपूर

पीक....

    माजले साऱ्या मनरानात तण अफाट कुविचारांचे.. उगवू देईना अंतरात पीक सकस सदविचारांचे...।।१।।   मशागत मनशेताची करून घ्यावी लवकरी.. उगवण या   तणांची घात पिकाचा करी...।।२।।   तण मुळासकट उखडूनी मोकळे करू शिवार.. पीक वाढेल सद्विचारांचे स्वच्छ रानी भरदार....!।।३।।   बंधुत्वाच्या बरसतील स्नेहमय   शीतल धारा.. पीक वाढेल माणुसकीचे वाहील प्रेमाचा झरा...।।४।।   पाहुनी   शेती सद्विचारांची मन हरखुनी जाईल.. माया अन ममतेची मधुर गाणी गाईल...।।५।। सौ. सुषमा सुतार मंगळवेढा