Skip to main content

वेळ

 


वेळ आहे अनमोल माणसा

वेळेला तू जाण माणसा ।।धृ ।।

नियतीचा हा खेळ माणसा

ओळखून तू चाल माणसा ।।1।।

 

वेळेवर जो करतो कर्म

त्याचे जीवन होते पावन

वेळे पेक्षा जगती कोणी

नाही आहे रे बलवान ।।2।।

 

भूत भविष्यात रंगुनी

मोहजालात अडकून

वर्तमान तू गमावू नको

वेळेला तू दवडू नको ।।3।।

 

लहानपण खेळण्यात

तारुण्य झोपण्यात

म्हातारपण राडण्यात

व्यर्थ तू घालवू नको ।।4।।

 

वेळ आणि कर्माची

सांगड घालुनी तू

यशाची तू कास धर

सुख भोगशील जीवनभर।।5।।

 

दिवास्वप्न रंगवूनी

वेळ घालवू नको

स्वतः बरोबर तू

जगताचा उद्धार कर।।6।।

 

वेळ नाहिरे कोणाची

जो तिच्याबरोबर चालेल

वेळेवर जो जागेल

वेळ होणार रे त्याची ।।7।।

आनंद जाधव

सरकारी उच्च प्राथमिक शाळा कोटमाल

ता हुलसुर जि बिदर

9535503233


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र माझा

  ऐतिहासिक , सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे फार मोठा महाराष्ट्र देशाच्या संस्कृतीचा ठसा   संत महंत , ऋषी मुनिंची पाऊले पडली इथेच संतांची शूरवीरांचा त्याग , पराक्रम आणि आहे परंपरा देशप्रेमाची   सर्वधर्मसमभावाचे इथेच केले आहे पालन शिवरायांनी केले हिंदवी स्वराज्य आणि रयतेचे राज्य स्थापन   लढा उभारून इंग्रजांविरुद्ध प्राण देउनी बनले महान देशभक्त कष्ट यातना अनंत भोगल्या सांडले त्यांचे देशासाठी रक्त   पावन स्पर्शाने उपकृत झाली संतांची मांदियाळी इथेच रुजली समाजसुधारकांच्या प्रबोधनाने महाराष्ट्र मराठी मने जपली   गीत , पोवाडे , कविता रचूनी महाराष्ट्राच्या मातीचे वर्णन मराठी मातीचा ललाटी टिळा थोरवी गायली करुनि कीर्तन   किती गाऊ मराठीचा गोडवा वैभवशाली इतिहासाचा परडा प्रगतीचे उंच शिखर गाठले चढूनि विविध क्षेत्राच्या कडा किरण पेठे , नागपूर

बिनभिंतींची शाळा...

  सकाळ होता किलबिल करती जमून पाखरे होती गोळा पिंपळ पारावरती भरते बिनभिंतींची त्यांची शाळा...   डहाळीवरती बैठक बसते दुपार होता कलती वेळ टुणटुण टुणटुण उड्या मारूनी सुरू होतो त्यांचा खेळ...   पोपट लागतो कविता वाचू मोर लागतो थुईथुई नाचू राघू घालतो मैनेला शीळ मोराच्या डोकी सोन्याचा तीळ   नाही पाटी ; नाही पुस्तक बिनफळ्याची ही तर शाळा इंद्रधनुच्या आकाराच्या बगळे गुंफती सुंदर माळा...   बिनछताची यांची शाळा वास्तुविशारद आहे लहान सुगरण बांधतो सुंदर महाल नाही ठेवत ऐवज गहाण...   कोकीळ कुहू ; चिमणी चिवचिव सुंदर जमली गट्टी-दोस्ती नाही करीत कुणी आता गडबड-गोंधळ ; दंगा-मस्ती...   भूक लागली ; दमली पाखरे पेरूच्या बागेत उडाला थवा बागेमध्ये बुजगावणं दिसे भ्याली पाखरे गुरुजी भासे...   पाखरे काढती तेथून पळ ज्वारीच्या शेतात ठोकती तळ ताटव्यासंगे डोलत पक्षी हळूच एक-एक दाणा भक्षी...   चोचीत घेतले दाणे भरून पिल्ले बसली घरटे धरून पिल्ले-पाखरे झाली गोळा सूर्य बुडाला सुटली शाळा...!   नानासाहेब बोरस्ते ...

गौरवशाली महाराष्ट्र

  समाजसुधारक , विचारवंत , संतांची पावनभूमी अमृताचा गोडवा मराठी मायबोलीत महाराष्ट्राचा काय वर्णावा गौरवशाली इतिहास माती जाते कस्तुरीच्या सुगंधाला झेलीत   नद्या , सरोवरे , नैसर्गिक सौंदर्याने नटला गड-किल्ल्यांनी महाराष्ट्र सजला नजर ना लागो कुणाची या वैभवाला शूरवीर , देशभक्त , राष्ट्रप्रेमी यांचा वारसा हा रुजला   आज कोरोनाच्या काळ्या सावटाशी लढतो आहे माझा महाराष्ट्र कित्येक कुटुंब केली त्याने उध्वस्त अर्ध्यावर मोडले संसार झाले सर्व नष्ट   जात-पात-धर्म विसरून माणूस माणसासाठी चहू दिशेला धावत आहे होऊनी आर्त संतांची सर्वधर्मसमभावाची शिकवण आज होताना दिसत आहे खरी सार्थ   डॉक्टर्स , परिचारिकांच्या पांढर्‍या वेशातील देवदूत लढत आहे अहोरात्र तैनातीला चोवीस तास खाकी वर्दीतील संरक्षक संपेल कधी हे कोरोनाचे विध्वंसक सत्र   लवकरच महाराष्ट्र मुक्त श्वास घेईल कारोनाचे विषारी वारे परतूनी लाविल वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार हा महाराष्ट्र माझा पुन्हा गरुडझेप घेईल श्रीम. तोरणे रेश्मा अनिल    ता.श्रीरामपूर, ज...